पिंपरी गावचा चेहरा–मोहरा बदलण्यासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला संधी द्या – माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आवाहन

पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (देवा भालके):
जबाबदारीची जाणीव असलेली माणसे अनावश्यक प्रश्नोत्तरांमध्ये न अडकता समोर असलेले काम कसे पूर्ण करता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. याच भूमिकेतून पुढील कार्यकाळात काम करण्याचा निर्धार असल्याचे मत व्यक्त करत, पिंपरी गावचा चेहरा–मोहरा बदलून टाकण्यासाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पॅनलच्या प्रचारार्थ तपोवन मंदिर परिसर, बाल गोपाळ विद्यालय, शिवदत्त नगर, धर्मा अपार्टमेंट आणि कुदळे पाडाळ परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

ठिकठिकाणी सुवासिनींनी उमेदवारांचे औक्षण करून, पेढे व साखर भरवत विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संदीप वाघेरे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत गेल्या पाच वर्षांत प्रभागात करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली. बहुतांश विकासकामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे आणि पिंपरी गावचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या प्रचारफेरीत पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजा कुदळे, शेखर अहिरराव, प्रवीण कुदळे, राकेश मोरे, अनिल रसाळ, अर्जुन कदम, विशाल कांबळे, अक्षय कदम, ईश्वर कुदळे, मिकी मान्दन, मयूर बोडगे, शरद कोतकर, हरेश पारखे, राजेंद्र वाघेरे, हनुमंत वाघेरे, अमोल गव्हाणे, सतीश वाघेरे, संकेत भालेराव, प्रीतम वाघेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.