Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

August 20, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पुणे»
पुणे

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comMay 7, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके:संदीप वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांना निवेदन देत स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ बाबत गंभीर आक्षेप नोंदविला आहे.

दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये मा. शिक्षण समिती सभा ठराव क्रमांक ७ दिनांक ०२/०४/२०२६ अन्वये नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटनुसार सदर विषयामध्ये नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून तसेच श्री विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नोंदविण्यात आले होते.

मात्र, सदर विषयास आपण कोणतीही संमती दिलेली नसून कोणताही ठराव सुचविलेला नाही, असे स्पष्ट करत नगरसेवक वाघेरे यांनी नगरसचिव कार्यालयाकडून दिशाभूल झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे आपल्या नावाची करण्यात आलेली नोंद तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, संबंधित विषयामध्ये यंत्रमाग व जगदंब या दोन्ही संस्था शासनाच्या असतानाही जगदंब संस्थेच्या दरामध्ये मोठी तफावत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर प्रति विद्यार्थी व प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

नगरसेवक संदीप वाघेरे यांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत :

स्थायी समिती ठराव क्र. ३६६, विषय क्र. ७ तात्काळ रद्द करण्यात यावा.
त्यांच्या नावाची चुकीची नोंद रद्द करण्यात यावी.
संबंधित प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या नगरसचिव व संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.