पिंपळे गुरव: देवा भालके:काशीद पार्क येथील प्रगतशील शेतकरी पै. पोपट लक्ष्मणराव काशिद परिवाराकडून बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैलांना अंघोळ घालून त्यांच्या शिंगांणा रंग लावून बाशिंग बांधून आणि अंगावर रंगीबेरंगी झुली घालून पिंपळे गुरव परिसरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेण्यात आले. बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा आणि कृतज्ञतेची भावना काशिद परिवाराकडून जपली जात आहे. परंपरा शेती संस्कृती आणि पशू धनाशी असलेले भावनिक नाते आजही टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मिरवणुकी दरम्यान पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, भाजप नगरसेवक श्याम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष युवा नेते तानाजी जवळकर, उद्योजक प्रदीप घारे, अमर आदियाल कुस्तीगीर संघांचे उपाध्यक्ष पै. गणेश काशिद आदी मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब काशीद, उत्तम काशीद, सुदाम काशीद गणेश काशीद व सर्व मित्र परिवार याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा
Related Posts
Add A Comment

