Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांसाठी अजित पवार यांची गुरुवारी सभा भाजपा नेत्या कोमल शिंदे यांचा प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांसाठी अजित पवार यांची गुरुवारी सभा भाजपा नेत्या कोमल शिंदे यांचा प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 7, 2026Updated:January 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, पुणे (दि. ०७ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता, लिंक रोड, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक धनराज आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे पाटील, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, माजी अध्यक्ष अजित गव्हाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी तसेच विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
तसेच भाजपाच्या प्रदेश निमंत्रित सदस्य तथा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कोमल रमेश शिंदे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजितदादा पवार यांनी त्यांचे स्वागत केले. कोमल शिंदे या उच्चशिक्षित असून प्रभाग क्रमांक १९ मधील आनंद नगर येथे त्यांचे माहेर आणि सासर आहे. मुक्ताई सोशल फाउंडेशन या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष असून पिंपरी चिंचवड शहर परिसरात ७०० पेक्षा जास्त महिला या संस्थेच्या सभासद आहेत. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला, स्वच्छता दूत, कचरावेचक महिला, छोटे मोठे व्यावसायिक, युवती यांचा सहभाग आहे. उच्चशिक्षित असणाऱ्या कोमल शिंदे यांचे संघटन कौशल्य विचारात घेऊन भाजपाने त्यांना विविध पदांवर काम करण्याची जबाबदारी दिली होती. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास आणि भविष्यातील शहर विकासाचे नियोजन मतदारांना सांगण्यासाठी आता कोमल शिंदे मैदानात उतरल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी आणि लहू तोरणे यांनी केले.
—————————-

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.