मारुंजी (ता. मुळशी, जि. पुणे) येथे निर्मिती डेव्हलपर्सच्या नव्या व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली.
या प्रसंगी डॉ. सुहास वारके, सुरेश काकडे, बाबासाहेब बुछाडे, विलास माडीगिरी, विजय कांबळे, डॉ. प्रीती रूपनार, जळिंदर गायकवाड आणि व्ही. ई. तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. दत्ता शेटे यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार व हितचिंतकांचे आभार मानले. त्यांच्या मते, सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.
मारुंजी येथील सर्व्हे क्र. 55/1/2/9/4 मधील हा प्लॉट व्यावसायिक वापरासाठी नियोजित असून, भविष्यात येथे दुकाने, स्टुडिओ अपार्टमेंट्स, क्लिनिक स्पेस तसेच विविध बहुउद्देशीय व्यावसायिक उपक्रम उभारण्याची योजना आहे. परिसराच्या वेगाने होत असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

