
पिंपरी-चिंचवड:गुन्हे शाखा युनिट-३ ने चऱ्होली परिसरात मोठी कारवाई करत २,००,४८०/- रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौक जवळील एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये काही इसम विदेशी दारूची विक्री करण्यासाठी साठा करून बसले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून खालील आरोपींना ताब्यात घेतले:
रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३, रा. चऱ्होली, पुणे)
तिलक हेमंत पटेल (वय २१, रा. वापी, गुजरात)
अनिल रामसुरत यादव (वय २४, रा. वापी, गुजरात)
जप्त केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी केलेल्या पाहणीत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
रॉयल चॅलेंज कंपनी: ६ बॉक्स आणि सुट्या ४०० बाटल्या.
इम्पेरिअल ब्लू कंपनी: ८ बॉक्स.
रॉयल स्ट्रॉग कंपनी: ६ बॉक्स.
मोबाईल फोन: आरोपींचे ३ मोबाईल.
एकूण किंमत: २,००,४८०/- रुपये.
तपास पथक:
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, आणि पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, उपनिरीक्षक सुनील जावळे आणि त्यांच्या पथकाचा समावेश होता.
