Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

August 20, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन
पिंपरी चिंचवड

वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comMarch 31, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा होत असून, त्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय पुन्हा एकदा शहरवासीयांना आला आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करणारे डब्बू आसवाणी यांनी यंदा मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवसाचा उत्सव टाळण्याचा निर्णय घेतला आहे. “शुभेच्छा स्वीकारणार आहे, मात्र केक किंवा पुष्पगुच्छ आणू नका. त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे,” असे भावनिक आणि सामाजिक भान जपणारे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे

.

“नारळासारखा बाहेरून कडक पण आतून मऊ, आणि नारळाच्या पाण्यासारखा गोड स्वभाव” अशी ओळख असलेल्या आसवाणी यांचा स्वभाव कामाच्या बाबतीत कडक, तर वागण्यात अत्यंत नम्र आणि गोड असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगितले जाते. कार्यक्षमतेसोबतच मानवी मूल्यांना प्राधान्य देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

डब्बू आसवाणी यांनी 2007 साली प्रथमच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत निवडून येत राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 2012, 2017 आणि आता 2026 मध्येही ते निवडून आले असून, त्यांनी उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे यशस्वीपणे भूषवली आहेत. सातत्यपूर्ण जनसंपर्क, विकासकामांवरील भर आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन यांच्या जोरावर ते चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

सिंधी समाजातून येणारे आसवाणी यांना पिंपरी परिसरातील व्यापारी वर्गाचा मोठा पाठिंबा लाभला आहे. मात्र, केवळ एका समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजघटकांमध्ये मिसळून काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांची लोकप्रियता अधिक वाढली आहे.

 

वाढदिfवसानिमित्त आज सकाळी त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करून दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर ते आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

डब्बू आसवाणी यांच्या या साधेपणाच्या निर्णयाचे आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा त्यांच्या या कृतीतून मिळत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026

मोशी दुर्घटनेतील इमारतीच्या बांधकामास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करा तांत्रिक चौकशीनंतर बिल्डर, अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी – गुलाबपान पाटील

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.