Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

August 20, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू
पिंपरी चिंचवड

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comApril 9, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

​भोसरी (प्रतिनिधी देवा भालके) दिनांक ९ एप्रिल २०२६:- राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ या कार्यालयाचे उद्घाटन (दि.९) महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे,प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी उपस्थित होते.

​या केंद्राच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की,ज्या मुलांकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मागे पडतात, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १००% मोफत सेवा मिळणार आहे.बाहेरून येणाऱ्या अनेक होतकरू मुलांना राहण्याची जागा शोधण्यापासून ते जॉब मिळवण्यापर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एजंटकडून त्यांची फसवणूक केली जाते. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्रे पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू केली आहेत. येथे नोंदणी, नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत मिळतील. ‘विनामूल्य नोकरी’ हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून तरुणांनी एका रुपयाचाही खर्च न करता या संधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या आतापर्यंत जवळपास दोन हजार युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहे.

​दहावी, बारावी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक फुगे प्रायमा,A विंग मधील तिसरा मजला ऑफिस नंबर १२ आणि चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर अशा दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त युवकांनी येथे नाव नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवावी.विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026

मोशी दुर्घटनेतील इमारतीच्या बांधकामास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करा तांत्रिक चौकशीनंतर बिल्डर, अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी – गुलाबपान पाटील

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.