Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comApril 9, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके) –

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदावर जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय व ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांना ‘घंटा भेट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

दि. १३ एप्रिल २०२६ रोजी ही सदिच्छा भेट होणार असून, यावेळी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदांवर संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

 

शहरातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या माध्यमातून अनेक आंदोलने व मोर्चे काढण्यात आले. या आंदोलनांदरम्यान अनेक कार्यकर्त्यांवर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल झाले. तरीदेखील त्यांना अपेक्षित न्याय मिळत नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

 

प्रभाग क्रमांक १३ मध्ये २०१७ पासून भाजपची ताकद वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. आगामी निवडणुकांमध्ये अधिकाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले; मात्र तरीही स्वीकृत नगरसेवक पदांवर त्यांची नियुक्ती करण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध गटांमध्ये नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत, भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आली आहे. शहराध्यक्ष, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनीही जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देत न्यायाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026

रिक्षा चोरून जबरी चोरी करणारा आरोपी १२ तासांत जेरबंद; गुन्हे शाखेची झटपट कारवाई

March 26, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.