Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Abc

April 30, 2026

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

April 30, 2026

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

April 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home » दापोडीतील ‘ग्रीन पार्क’ प्रकल्प रखडला; घरखरेदीदारांचा संताप, डिसेंबरपर्यंत फ्लॅट देण्याचे आश्वासन
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

दापोडीतील ‘ग्रीन पार्क’ प्रकल्प रखडला; घरखरेदीदारांचा संताप, डिसेंबरपर्यंत फ्लॅट देण्याचे आश्वासन

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comApril 26, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड: देवा भालके:दापोडी परिसरातील ‘ग्रीन पार्क’ या गृहनिर्माण प्रकल्पात २०१९ साली लाखो रुपये गुंतवून फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांना अद्यापही घरे मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडल्यामुळे आज प्रकल्पातील गुंतवणूकदार नागरिक एकत्र येत बांधकाम व्यावसायिकांच्या घरी जाऊन जाब विचारला.

“आम्ही २०१९ मध्ये पैसे भरले, कोविड काळातही सहकार्य केले. मात्र आजपर्यंत फ्लॅट मिळाले नाहीत. आमचे घर आम्हाला नेमके कधी मिळणार?” असा सवाल घरखरेदीदारांनी उपस्थित केला. अनेकांनी आपली आर्थिक अडचण आणि वाढलेला ताण याबाबतही भावना व्यक्त केल्या.

यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, काही ग्राहकांनी अद्याप पूर्ण पैसे भरलेले नाहीत. उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन संबंधितांना करण्यात येणार असून, प्रकल्प पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व फ्लॅट्स ताब्यात देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, घरखरेदीदारांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुढील काळात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणाकडे आता स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

Abc

April 30, 2026

महिला आरक्षण की प्रतिनिधी राजकारण ? पिंपरी चिंचवड मधील वास्तवाचा वेध

April 29, 2026

महिला आरक्षण की ‘प्रतिनिधी’ राजकारण? पिंपरी-चिंचवडमधील वास्तवाचा वेध

April 29, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.