Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Abc

April 30, 2026

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

April 30, 2026

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

April 30, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home » अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी चिंचवड

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comApril 30, 2026Updated:April 30, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके) पिंपरी चिंचवड दि.३० एप्रिल २०२६: मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण* करण्यात यावे, या मागणीसाठी *हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघ तसेच पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज* यांच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली.

शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व हिंदू मातंग सेनेचे संस्थापक प्रमुख अरूण जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसीलदार कार्यालय, निगडी-४४ येथे निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.

यावेळी युवराज दाखले म्हणाले, “दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यासह सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाने बहुमताने अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणासंदर्भात ऐतिहासिक निर्णय दिला आहे. राज्य सरकारने या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून अनुसूचित जातींमधील *शोषित व वंचित समूहाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा करावा.

“अ ब क ड वर्गीकरणाशिवाय खऱ्या गरजू व वंचित समाजाला न्याय मिळणार नाही. शासनाने याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करावा, अन्यथा हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघ* राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडेल,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात मातंग समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. _”आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!”_ आणि _”अ ब क ड वर्गीकरण झालेच पाहिजे!”_ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

निदर्शने आंदोलनास पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे, हिंदू मातंग सेना संस्थापक प्रमुख अरूण जोगदंड, सचिव संजय ससाणे, खजिनदार हनुमंत उर्फ नाना कसबे, मार्तंड देवस्थानचे विश्वस्त अनिल सौदडे,सामाजिक कार्यकर्ते मारूती जाधव,उद्योजक अनिल गायकवाड, चंद्रकांत दादा लोंढे, शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष कृष्णा साबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, शिवशाही माथाडी कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष सचिन दोनघहू, अविनाश लोणारे, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व अध्यक्ष बाबा रसाळ, मा अध्यक्ष भगवान शिंदे,

लहुजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष सतिश भवाळ, डॉ हेमंत देवकुळे,सुनील भिसे, नितीन घोलप, आण्णासाहेब कसबे, मधुकर गवारे,चंद्रकांत दादा लोंढे, संजय एडके, शिवाजी साळवे,राजेंद्र मोरे, शिवाजी ढावरे,भारत गव्हाणे, रामदास राक्षे, पत्रकार संतोष रणसिंग, विलास रूपटक्के, सूरेश वैरागर, नर्सिंग वैरागर , विकास कांबळे,आकाश चव्हाण, शांताराम खुडे, मांगल्य प्रतिष्ठाचे संस्थापक अध्यक्ष राजू आवळे,पत्रकार अविनाश कांबीकर,निखिल अरणे, गणपत जाधव, शंकर खवळे, सुभाष लांडगे , बालाजी गवारे, संभाजी शिंदे, नाना कांबळे ,मारुती सोनटक्के, स्वप्नील वाघमारे, मयूर घोलप, संरपच संदीप जाधव, पैलवान विठ्ठल शिंदे, आबाजी भवाळ, हनुमंत वाघमारे,शिवशाही व्यापारी संघ उपनेत्या उषा माई कांबळे, सविता ताई आव्हाड,अनिता वैरागळताई, शिवशाही शहर अध्यक्षा दिपाली लोंढे, गीता आढागळे, राधा पाटोळे, कविता थोरात, आकाबाई गडसिंग,ललीता मगर,सविता दोनघऊ, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

April 30, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.