Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

August 20, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
पिंपरी चिंचवड

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comApril 30, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी देवा भालके (दि. ३० एप्रिल २०२६) साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे थेरगाव चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या, विविध ९ भाषेतील ५५१ पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे. तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा पुस्तक संग्रह करणारे संभाजी बारणे हे एकमेव आहेत असा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यामुळे सर्व शिवप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाजी बारणे हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील उच्चशिक्षित रहिवाशी असून शेती व बांधकाम व्यवसाय करतात. त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध धातूंमधील विविध आकारांच्या ७० पेक्षा जास्त मूर्ती देखील आहेत. केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेल्या दोन रुपयांच्या दीड हजार नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे. ही पुस्तके आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, नाणी नागरिकांना पाहण्यासाठी त्यांच्या थेरगाव येथील कार्यालयात रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत उपलब्ध आहेत. थेरगाव गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्ध पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी बारणे यांनी पुढाकार घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही पुस्तके वाचण्यासाठी व संदर्भ साठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचेही संभाजी बारणे यांनी सांगितले.
शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण साहित्य अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारे बारणे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील १९७८ सालापासून २०२२ पर्यंतच्या आजी-माजी नगरसेवकांच्या १२०० व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला आहे. त्याची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये २०१९ मध्ये घेण्यात आली आहे. महानगरपालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद आहेत. त्यांनी संपादन केलेल्या
“पिंपरी चिंचवड वैभव” या कविता संग्रहाचे ज्येष्ठ सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे.
————

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026

मोशी दुर्घटनेतील इमारतीच्या बांधकामास जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करा तांत्रिक चौकशीनंतर बिल्डर, अभियंते व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी – गुलाबपान पाटील

July 16, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.