Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

₹४३०.७५ कोटींच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी; स्थायी समितीत गदारोळ

July 2, 2026

पद नाही, अधिकार नाही; तरीही स्थायी समितीत देवण्णा गट्टुवारांचा हस्तक्षेप? पेन्शन लाखोंची, तरी महापालिकेचा मोह सुटेना; गट्टुवार पुन्हा चर्चेत

June 24, 2026

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पत्राची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

May 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home » पद नाही, अधिकार नाही; तरीही स्थायी समितीत देवण्णा गट्टुवारांचा हस्तक्षेप? पेन्शन लाखोंची, तरी महापालिकेचा मोह सुटेना; गट्टुवार पुन्हा चर्चेत
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

पद नाही, अधिकार नाही; तरीही स्थायी समितीत देवण्णा गट्टुवारांचा हस्तक्षेप? पेन्शन लाखोंची, तरी महापालिकेचा मोह सुटेना; गट्टुवार पुन्हा चर्चेत

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJune 24, 2026Updated:June 29, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"resize":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. 12 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सहशहर अभियंता देवण्णा गट्टुवार हे सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणतेही अधिकृत पद किंवा जबाबदारी नसताना त्यांचा स्थायी समिती कार्यालयातील वाढता वावर आणि काही महत्त्वाच्या विषयांतील कथित सहभाग याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

महापालिकेत चार दशकांहून अधिक काळ सेवा बजावलेल्या गट्टुवार यांनी अभियांत्रिकी आणि प्रशासकीय क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र निवृत्तीनंतरही ते नियमितपणे महापालिकेत येत असल्याची चर्चा असून, विशेषतः स्थायी समिती कार्यालयात त्यांची उपस्थिती अनेकांच्या नजरेत भरत आहे.

महापालिका वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांना गट्टुवार हे अनौपचारिक सल्ला देत असल्याचे बोलले जात आहे. अधिकृत नियुक्ती अथवा मान्यता नसताना ते विविध आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन करत असल्याची चर्चा आहे. काही कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, गट्टुवार हे दिवसभर स्थायी समिती कार्यालयात उपस्थित राहून विविध फाईली, प्रस्ताव आणि निर्णय प्रक्रियेबाबत चर्चा करत असतात.

यामुळे महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत निवृत्त अधिकाऱ्यांचा सहभाग कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेतील आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार हे संबंधित अधिकारी, प्रशासक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे असतात. अशा परिस्थितीत कोणतेही अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीचा सातत्याने होणारा वावर आणि कथित हस्तक्षेप यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची चर्चा आहे.

निवृत्त अधिकाऱ्यांचा अनुभव प्रशासनासाठी उपयोगी ठरू शकतो, याबाबत दुमत नाही. मात्र अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत सहभाग यामध्ये स्पष्ट सीमारेषा असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. गट्टुवार यांचा सहभाग केवळ सल्लागार स्वरूपाचा आहे की त्यापलीकडे काही भूमिका आहे, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, गट्टुवार यांना निवृत्तीनंतर लाखो रुपयांची पेन्शन आणि इतर निवृत्तीवेतन लाभ मिळत असतानाही त्यांचा महापालिकेतील वाढता वावर अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल ४० वर्षांची सेवा पूर्ण करूनही प्रशासनातील घडामोडींमध्ये त्यांची कायम असलेली रुची काहींना आश्चर्यकारक वाटत असून, तर काहीजण त्यामागे वेगळी कारणे असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महापालिका प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी होत आहे. देवण्णा गट्टुवार यांना कोणत्याही स्वरूपाची अधिकृत जबाबदारी देण्यात आली आहे का? ते कोणत्या अधिकाराने स्थायी समितीच्या कामकाजात सहभागी होत आहेत? त्यांचा वावर प्रशासनाच्या परवानगीने आहे की वैयक्तिक स्तरावर? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत.

या संदर्भात महापालिका प्रशासन, स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे आणि देवण्णा गट्टुवार यांची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मात्र तोपर्यंत निवृत्तीनंतरही महापालिकेच्या सत्ताकेंद्रांमध्ये त्यांची सक्रिय उपस्थिती चर्चेचा विषय राहणार, हे निश्चित.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पत्राची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

May 22, 2026

“माझ्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर; संबंधितांवर कारवाई करा” – आयुक्त व स्थायी समिती सभापतींकडे निवेदन

May 7, 2026

Abc

April 30, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.