Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन

October 20, 2026

2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा

October 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»पालिकेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शासन मान्यता नसतानाही मुख्य समन्वयक, समन्वयकांची पदनिर्मिती; पदे रद्द करण्याची सचिन काळभोर यांची मागणी
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

पालिकेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार? शासन मान्यता नसतानाही मुख्य समन्वयक, समन्वयकांची पदनिर्मिती; पदे रद्द करण्याची सचिन काळभोर यांची मागणी

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comSeptember 7, 2026Updated:September 7, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी देवा भालके

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील बालवाडी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत तब्बल १९१ बालवाडी शिक्षिका व सेविका मानधनावर कार्यरत असताना, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मुख्य समन्वयक आणि आठ समन्वयक अशी पदे शिक्षण विभागाने स्वतंत्र ठराव करून निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पदांना शासनाची मान्यता नसतानाही पदनिर्मिती करण्यात आली असून, या पदांचा कोणताही आकृतीबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मुख्य समन्वयक आणि समन्वयक ही पदे मंजूर नसतानाही संबंधितांना भरघोस मानधनवाढ देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२०२३ मध्ये एका अपात्र बालवाडी शिक्षिकेला मुख्य समन्वयकपद देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत असंख्य तक्रारी झाल्यानंतर जुलै २०२६ मध्ये दुसऱ्या समन्वयकाला मुख्य समन्वयकपद देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, बालवाडी विभागातील कथित गैरप्रकारांबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी दाखल असल्याचेही सांगण्यात आले आहे. मुख्य समन्वयक आणि समन्वयक ही पदे रद्द करण्यात यावीत, यासाठी अनेक बालवाडी शिक्षकांनी महापालिकेकडे अर्ज केल्याचेही समोर आले आहे.

या सर्व प्रकारामुळे महापालिका शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून, मानधनावरील बालवाडी मुख्य समन्वयक व समन्वयकांची पदे तातडीने रद्द करावीत, अशी मागणी सचिन काळभोर यांनी केली आहे.

“शासनाची मान्यता नसलेल्या पदांची निर्मिती करून त्यावर आर्थिक लाभ देणे हा गंभीर प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित पदे रद्द करण्यात यावीत,” अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

रांका ज्वेलर्समध्ये भारतीय सॉलिटेअर महोत्सवाची दिमाखदार सांगता; विजेत्याला मिळाली नवी कोरी XUV 7XO कार! देशभरातील सॉलिटेअर महोत्सवाची पुण्यात उत्साहपूर्ण सांगता; विजेत्याच्या घरी आली नवी XUV 7XO!

October 11, 2026

गणवेश पुरवठ्यात कथित अनियमितता; जगदंबा महिला संस्थेचे ३० कोटींचे पेमेंट रोखण्याची मागणी

September 17, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.