Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन

October 20, 2026

2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा

October 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»गणवेश पुरवठ्यात कथित अनियमितता; जगदंबा महिला संस्थेचे ३० कोटींचे पेमेंट रोखण्याची मागणी
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

गणवेश पुरवठ्यात कथित अनियमितता; जगदंबा महिला संस्थेचे ३० कोटींचे पेमेंट रोखण्याची मागणी

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comSeptember 17, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड : देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शालेय गणवेश पुरवठ्याच्या प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत जगदंबा महिला संस्था यांना देण्यात येणारे कोणतेही पेमेंट थांबवावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात यापूर्वी १९ मे २०२६ रोजी पत्राद्वारे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास संबंधित बाबी आणून देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणाची अद्याप सर्वंकष चौकशी पूर्ण झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

जगदंबा महिला संस्था शालेय गणवेश पुरवठ्याचे काम करण्यासाठी नियमानुसार पात्र आहे का, संस्थेची तांत्रिक व आर्थिक पात्रता काय आहे, तसेच काम देताना महापालिकेचे लागू नियम आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले का, याची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

रेट कॉन्ट्रॅक्टचा आधार घेऊन थेट खरेदी (Direct Procurement) करण्यात आल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. या प्रक्रियेची वैधता, प्रशासकीय मंजुरी, संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकारक्षेत्र, निविदा व खरेदी प्रक्रियेतील नियमांचे पालन तसेच संबंधित कागदपत्रांची सत्यता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, संबंधित संस्थेला अंदाजे ३० कोटी रुपयांचे पेमेंट देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. चौकशी प्रलंबित असताना एवढ्या मोठ्या रकमेचे पेमेंट झाल्यास पुढील चौकशीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, सार्वजनिक निधीच्या संरक्षणासाठी पेमेंट तत्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात जगदंबा महिला संस्थेला अॅडव्हान्स, अंतरिम बिल, अंतिम बिल किंवा अन्य कोणतेही देयक चौकशी पूर्ण होईपर्यंत अदा करू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.

तसेच, संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरील स्वतंत्र, निष्पक्ष आणि वेळबद्ध चौकशी करून अहवाल सार्वजनिक हिताच्या दृष्टीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. गणवेश पुरवठ्याची संपूर्ण खरेदी प्रक्रिया, संस्थेची पात्रता, रेट कॉन्ट्रॅक्ट, थेट खरेदीची आवश्यकता व वैधता, प्रशासकीय आणि आर्थिक मंजुरी तसेच संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौकशीत नियमांचे उल्लंघन, प्रशासकीय त्रुटी किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी अथवा अन्य जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा विषय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आल्याचा उल्लेख करत, शासन स्तरावर अंतिम निर्णय होईपर्यंत संबंधित संस्थेला कोणतेही पेमेंट करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

सार्वजनिक निधीचा वापर पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने होणे आवश्यक असल्याने, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी आर्थिक व्यवहार करण्याऐवजी प्रथम संपूर्ण प्रक्रियेची वैधता तपासावी, असे निवेदनात म्हटले आहे. चौकशी प्रलंबित असताना आर्थिक व्यवहार झाल्यास त्याची प्रशासकीय व वैधानिक जबाबदारी संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकारी आणि प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

आता महापालिका प्रशासन या आरोपांची आणि मागण्यांची कोणती दखल घेते, तसेच संबंधित गणवेश पुरवठ्याचे पेमेंट थांबवून स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले जातात का, याकडे लक्ष लागले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

रांका ज्वेलर्समध्ये भारतीय सॉलिटेअर महोत्सवाची दिमाखदार सांगता; विजेत्याला मिळाली नवी कोरी XUV 7XO कार! देशभरातील सॉलिटेअर महोत्सवाची पुण्यात उत्साहपूर्ण सांगता; विजेत्याच्या घरी आली नवी XUV 7XO!

October 11, 2026

आळंदी शहराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी दिघी-आळंदी वाहतूक विभागाचा मोठा निर्णय; विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध

September 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.