आळंदी : आळंदी शहरात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता दिघी-आळंदी वाहतूक विभागाने जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. आळंदी शहराकडे येणाऱ्या विविध मार्गांवर जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
आळंदी फाटा, चाकण येथून आळंदी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
तसेच चिंबळी फाटा, चाकण येथून आळंदी शहराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांनाही प्रवेश बंद करण्यात आला आहे.
शेलपिंपळगाव, वडगाव घेणंद येथून आळंदी शहराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे.
याशिवाय धानोरे फाटा, मरकळ येथून आळंदी शहराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
विश्रांतवाडी रोडवरील देहूफाटा येथून आळंदी शहराकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनाही प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
या वाहतूक बदलांमुळे आळंदी शहराकडे येणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

