Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन

October 20, 2026

2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा

October 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
पिंपरी चिंचवड

पिंपरीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comSeptember 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी : प्रतिनिधी देवा भालके:पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९४/२०१९ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७६ तसेच POCSO Act मधील कलम ३, ४, ५ आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील आरोपी हेमंत कृष्णा तांडेल (वय ३५) याच्याविरुद्ध पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी केला.

२१ सप्टेंबर २०२६ रोजी पिंपरी-चिंचवड जिल्हा सत्र न्यायालयातील मा. एस. एस. नायर, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे आरोपीला दोषी ठरवत २० वर्षांची सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. न्यायालयीन कामकाजासाठी GPSI दीपक गायकवाड यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले, तर ASI राजेंद्र उंबरे आणि पोलीस कॉन्स्टेबल इसाक शेख यांनी कोर्ट ड्युटी अंमलदार म्हणून जबाबदारी पार पाडली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर कारवाई करून दोषींना शिक्षा मिळवून देण्याच्या दृष्टीने या निकालाकडे पाहिले जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन

October 20, 2026

2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा

October 13, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रस्ते व स्थापत्य कामांचे विशेष ऑडिट करा! उपअभियंता स्वप्नील शिर्के आणि कनिष्ठ अभियंता अमोल पवार यांच्या अखत्यारितील पाच वर्षांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.