Author: maharashtra18news2026@gmail.com

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ ज्ञानेश्वर नगरी–अशोक थिएटर चौक परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून पॅनेलला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वृषाली हॉटेल, डांगे चाळ, ज्ञानेश्वर नगरी, अतिथी हॉटेल, अशोक थिएटर व पॉवर हाऊस परिसरातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत तरुण व महिला वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला. यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच…

Read More

पिंपरी | प्रतिनिधी देवा भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी पिंपरी गावात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे प्रभाग २१ मधील निवडणूक प्रचाराला मोठी रंगत येणार असून राजकीय वातावरण तापले आहे. ही माहिती माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी दिली. डब्बू आसवानी पुढे बोलताना म्हणाले की, “अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली. त्या संधीचे मी पूर्णपणे सोने केले. माझ्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, नागरी सुविधा…

Read More

पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (देवा भालके) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी पिंपरी गावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली. ही सभा पिंपरी गावातील श्री शिवछत्रपती स्मारक चौक येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नुकत्याच पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सन २०१७ मध्ये महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपने महापालिकेला कर्जबाजारी केले असून पालिकेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच काही मंडळींकडे…

Read More

पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (देवा भालके): जबाबदारीची जाणीव असलेली माणसे अनावश्यक प्रश्नोत्तरांमध्ये न अडकता समोर असलेले काम कसे पूर्ण करता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. याच भूमिकेतून पुढील कार्यकाळात काम करण्याचा निर्धार असल्याचे मत व्यक्त करत, पिंपरी गावचा चेहरा–मोहरा बदलून टाकण्यासाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पॅनलच्या प्रचारार्थ तपोवन मंदिर परिसर, बाल गोपाळ विद्यालय, शिवदत्त नगर, धर्मा अपार्टमेंट आणि कुदळे पाडाळ परिसरात भव्य…

Read More

पिंपरी, दि. ०५ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी): पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोसायट्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी पॅनलला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पॅनलचा प्रचार सध्या जोरात सुरू असून प्रचार फेरी, पदयात्रा, घरोघरी संपर्क तसेच सोसायट्यांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यात येत आहे. पिंपरी गावातील यशदा फ्लोरेन्झा सोसायटी, सुखवानी सोसायटी, सुखवानी कॅसल आणि सुखवानी सिटी येथील सोसायटीधारकांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपला जाहीर…

Read More

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील ऐश्वर्यम हमारा सोसायटी फेज-१ व फेज-२ मधील रहिवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बिल्डरकडे प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या देयकाचा प्रश्न भाजपा आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या सक्रिय व प्रभावी मध्यस्थीमुळे अखेर मार्गी लागला आहे. आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे बिल्डरने सदर रक्कम सोसायटीस देण्यास सहमती दर्शविली आहे. सोसायटीधारकांनी सांगितले की, “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला पाणीपुरवठ्याचे हक्क मिळाले. ही मदत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे सोसायटीतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरच सुटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोसायटीच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “या आर्थिक दिलास्यामुळे केवळ पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तर सोसायटीतील इतर…

Read More

पिंपरी, पुणे (दि. ०५ जानेवारी २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह रविवारी, भाट नगर, बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी दारात रांगोळीच्या पायघड्या घालून, दारावर तोरण बांधून उमेदवारांचे औक्षण केले आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी घड्याळाचे चिन्ह पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, सुनील साठे, दिनेश…

Read More

पिंपरी | चिंचवड दि.०५ जानेवारी २०२६ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे झुकत असताना, प्रचाराचा सूर अधिकच धारदार झाला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार व माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी प्रचारात वेगळा अँगल घेतला असून, “घोषणांची नव्हे तर केलेल्या कामांचीच मतदार परीक्षा घेतात,” असा ठाम संदेश त्या देत आहेत. सध्या प्रभागात पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ सुरू आहे. मात्र, डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा प्रचार केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता, त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांवर आधारित असल्याने तो मतदारांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…

Read More

पिंपरी, पुणे (दि. ०४ जानेवारी २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांनी शेकडो कार्यकर्त्यांसह चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी परिसरात घरोघरी जाऊन घड्याळाचे चिन्ह पोहचवून प्रचार केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचाराचा आजचा पहिला रविवार होता. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवारांनी प्रचारात आक्रमकपणे आघाडी घेतली. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी (दि. ३), शनिवारी आनंद नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. ढोल, ताशाच्या निनादात महिला भगिनींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी…

Read More

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अनेक प्रभागातील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १९ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सविता धनराज आसवानी यांनी गुरुवारी बौद्ध नगर परिसरात महिलांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मागील ८ ते ९ वर्षांपासून बौद्ध नगर परिसरात पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, या परिसरातील दुर्गंधी बाबत महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या शहरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध काम करू असे यावेळी सविता धनराज आसवानी यांनी महिला भगिनींना सांगून आश्वस्त केले. यावेळी नंदा कुंजीर, बबली शेख, कोमल तडसरे, अनिता तलवारे, सविता ढावरे, शोभा…

Read More