Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»राष्ट्रवादी काँग्रेसच शहराचा नियोजनबद्ध विकास करू शकते, सोसायटी धारकांचा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांनी साधला सोसायटी धारकांशी संवाद
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेसच शहराचा नियोजनबद्ध विकास करू शकते, सोसायटी धारकांचा विश्वास राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारांनी साधला सोसायटी धारकांशी संवाद

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 6, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, पुणे देवा भालके (दि. ०६ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच करू शकतात. पुणे मुंबई महामार्ग, नाशिक फाटा ते मोशी नाशिक महामार्ग, महामार्ग – रेल्वे लाईन आणि नदी नदीवरून जाणारा सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर हे भव्य विकास प्रकल्प अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीतून विकसित केले आहेत. शहराचा विकासाचा वेग मागील ९ वर्ष ठप्प झाला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि प्रगतीचे ध्येय गाठण्यासाठी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येणे आवश्यक असल्याचे मत एम्पायर इस्टेट, सागर सोसायटी या उच्चवर्गीय सोसायटी मधील नागरिकांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह एम्पायर इस्टेट, सागर सोसायटी मधील नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करून १५ जानेवारी रोजी होणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी प्रचार पत्रक वाटप केले. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना घड्याळ चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन धनराज आसवानी आणि कोमल दीपक मेवाणी यांनी केले.

—————————-

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026

वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन

March 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.