पिंपरी चिंचवड

पिंपरी गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार ज्ञानेश्वर नगरी–अशोक थिएटर परिसरात प्रचार रॅलीस उदंड प्रतिसाद

पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ ज्ञानेश्वर नगरी–अशोक थिएटर चौक परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला.

प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून पॅनेलला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वृषाली हॉटेल, डांगे चाळ, ज्ञानेश्वर नगरी, अतिथी हॉटेल, अशोक थिएटर व पॉवर हाऊस परिसरातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत तरुण व महिला वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला.

यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षांत प्रभागात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा धावता आढावा घेतला. “पदावर असो अथवा नसो, सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव प्रयत्नशील राहिलो आहे,” असे त्यांनी सांगितले.

या प्रचार फेरीत शिक्षण मंडळाच्या माजी सभापती गिरिजा कुदळे, प्रवीण कुदळे, अजिंक्य कुदळे, सुनील कुदळे, रामभाऊ कुदळे, सोपान कुदळे, गणेश कुदळे, अभिजीत कुदळे, सुहास कुदळे, गौरव कुदळे, श्री कुदळे, आकाश कुदळे, वैभव कुदळे, प्रतीक भूमकर, शंतनू आल्हाट, अक्षय नाणेकर, सोनू कदम, कुणाल सातव, शेखर अहिरराव, राजेंद्र वाघेरे, समीर वाघेरे, मयूर वाघेरे, प्रीतम वाघेरे, विष्णू जाचक, अविनाश गव्हाणे, अमोल गव्हाणे, आशु आसवानी, अमित आसवानी, हरीश आसवानी, राज आसवानी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button