Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत – धनराज आसवानी  घड्याळाला मत देऊन प्रभाग क्रमांक १९ राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा – कोमल मेवाणी 
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादीला मत म्हणजे विकासाला मत – धनराज आसवानी  घड्याळाला मत देऊन प्रभाग क्रमांक १९ राष्ट्रवादीच्या पॅनेलला विजयी करा – कोमल मेवाणी 

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 10, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, चिंचवड पुणे प्रतिनिधी देवा भालके (दि. १० जानेवारी २०२६) गाव खेड्यांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड शहराची स्थापना झाली. आता पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रोसिटी म्हणून ओळखले जात आहे. आय. टी. उद्योग, शिक्षण आणि रोजगारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असलेल्या बेरोजगार तरुणांना पिंपरी चिंचवड येथे रोजगार मिळण्याची खात्री वाटते, मागील ३५ वर्षात लोकांमध्ये हा विश्वास मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी नियोजन करून निर्णय घेतले आहेत. विकासाचा वेग मागील १० वर्षात कमी झाला होता. आता पुन्हा महापालिकेत राष्ट्रवादीला सत्ता द्या असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवाणी यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी श्रीधर नगर, उद्यम नगर, दळवी नगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला.

यावेळी माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक काळूराम पवार, कोमल मेवाणी, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे, युवा नेत्या कोमल शिंदे, जय आसवानी, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदींनी प्रचारात सहभाग घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हेच पिंपरी चिंचवड च सर्वांगीण विकास करू शकतात असा विश्वास मिळाल्यामुळेच मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुज्ञ मतदारांनी १५ जानेवारी रोजी घड्याळाच्या चिन्हा पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतांनी विजयी करावे असे आवाहन माजी नगरसेविका कोमल मेवाणी यांनी यावेळी मतदारांना केले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026

वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन

March 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.