Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»“प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादीचे पॅनल बहुमताने विजयी करा” – अजित पवारांचे आवाहन “२०१७ नंतर महापालिका कर्जाच्या खाईत, पुन्हा सुवर्णकाळ आणू” – अजित पवार
पिंपरी चिंचवड

“प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादीचे पॅनल बहुमताने विजयी करा” – अजित पवारांचे आवाहन “२०१७ नंतर महापालिका कर्जाच्या खाईत, पुन्हा सुवर्णकाळ आणू” – अजित पवार

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 10, 2026No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड (१० जानेवारी २०२६) प्रतिनिधी देवा भालके : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी रोजी घड्याळाचे चिन्ह पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जमुक्त करून शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल असे आस्वासन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पिंपरी येथील सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे आयोजित केलेल्या सभेत अजितदादा पवार यांनी मतदारांना संबोधित केले.

यावेळी आमदार रोहित पवार, माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक धनराज आसवाणी, काळूराम पवार, कोमल मेवाणी, अनंत कोऱ्हाळे, अश्विनी चिंचवडे, युवा नेत्या कोमल शिंदे आदींसह परिसरातील मतदार बंधू, भगिनी आणि प्रभाग क्रमांक १९ चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, १९९२ पासून २०१७ पर्यंत पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम मी केले. यावेळी कोणताही जातीभेद, धर्मभेद मी केला नाही. सर्व समाजातील उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन शहर विकासाचे काम केले. यामध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारले, ग्रेड सेपरेटर, सर्विस रोड, पुणे मुंबई महामार्ग ६१ मीटर करणे, मेट्रोची परवानगी घेतली. स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त शहर ठेवण्यासाठी काम केले. स्वच्छतेच्या बाबतीत शहराला अनेक वेळा देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले. शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पवना नदीतून पाणीपुरवठा कोटा वाढवून घेतला भामा आसखेड धरणातून ज्यादा पाणी मंजूर करून दिले. अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांना सोबत घेऊन पदे देऊन सन्मान दिला. अनेकांना महापौर पद, स्थायी समितीचे अध्यक्ष पद दिले आणि तेच आता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, त्यांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी माजी महापौर अपर्णा डोके व संजोग वाघेरे आणि उषा वाघेरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

२०१७ नंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभारी बदलला या नव्या कारभाऱ्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जाच्या खाईत लोटले अध्याप ही चार हजार कोटींची बिल देणे बाकी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ठेवी दहा हजार कोटी व्हायला पाहिजे होत्या. भाट नगर वसाहत मोडकळीस आली आहे. त्याचा पुनर्विकास केला पाहिजे. नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी टाटा कंपनीकडून वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी शहरवासीयांना दिले जावे यासाठी प्रयत्न करू. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या. मी पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल. शहराला कर्जातून बाहेर काढून दर्जेदार विकासाचा वेग वाढवून, तरुण-तरुणींना रोजगार निर्मितीसाठी शिक्षण, प्रशिक्षण देऊ, उद्योग धंद्याला पोषक वातावरण निर्माण करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.