पिंपरी | चिंचवड दि.०५ जानेवारी २०२६
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे झुकत असताना, प्रचाराचा सूर अधिकच धारदार झाला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार व माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी प्रचारात वेगळा अँगल घेतला असून, “घोषणांची नव्हे तर केलेल्या कामांचीच मतदार परीक्षा घेतात,” असा ठाम संदेश त्या देत आहेत.
सध्या प्रभागात पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ सुरू आहे. मात्र, डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा प्रचार केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता, त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांवर आधारित असल्याने तो मतदारांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.
महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आजही नागरिकांच्या स्मरणात आहेत. रस्ते व पायाभूत सुविधा विकास, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता अभियान, आरोग्य सुविधा, महिला व बालकल्याणाच्या योजना यामध्ये त्यांनी प्रभावी भूमिका बजावली असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे शहराच्या कारभारावर त्यांची वेगळी छाप राहिली आहे.
या निवडणुकीत डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांच्यासोबत स्थानिक प्रश्नांची जाण असलेला सक्षम आणि सक्रिय पॅनल मैदानात उतरल्याने प्रचारात नवचैतन्य आले आहे. युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत असून, “अनुभव असलेले नेतृत्वच प्रभागाचा खरा विकास करू शकते,” असा सूर मतदारांमध्ये ऐकू येत आहे.
वाहतूक समस्या, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि प्रभागाचा संतुलित विकास याबाबत त्यांनी स्पष्ट आराखडा मतदारांसमोर मांडला आहे. “शहराचा विकास करण्याची संधी मला मिळाली, आता प्रभाग क्रमांक ९ चा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प आहे,” असे त्या म्हणाल्या.
एकूणच प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रचाराची रंगत वाढली असून, अनुभव, विश्वासार्ह कामगिरी आणि संघटित पॅनलच्या बळावर आपण विजय मिळवू, असा ठाम आत्मविश्वास डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी व्यक्त केला आहे.
- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
घोषणांपेक्षा कामाचा हिशेब महत्त्वाचा! – डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा विकासाचा ठाम सूर प्रभाग ९ मध्ये अनुभव, विश्वास आणि विकासकामांचा प्रचार केंद्रस्थानी
Related Posts
Add A Comment
