Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»पिंपरी चिंचवड»पिंपरी-चिंचवडमध्ये ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव’ उत्साहात साजरा होणार
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव’ उत्साहात साजरा होणार

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comMarch 23, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी-चिंचवड देवा भालके: शहरात ‘बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती’ आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून, गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी ऐतिहासिक भीमसृष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जगातील महान शासनकर्ते म्हणून ओळखले जाणारे सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्माचा प्रसार जागतिक स्तरावर केला. त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून होणार आहे. त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता पंचशील ध्वजारोहण व बुद्ध वंदना पार पडेल.

सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, ‘दिया स्ट्रीट डान्स ग्रुप’ हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण असणार आहे. रात्री ७ ते ८ या वेळेत ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक आणि बुद्ध धम्म’ या विषयावर प्रा. प्रकाश पवार (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत प्रसिद्ध गायक कुणाल वराळे व त्यांच्या संचाकडून ‘गाथा युगपुरुषांची’ हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.

या महोत्सवाचे अध्यक्षपद बौद्ध समाज विकास महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब डोळस भूषविणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून राजू भालेराव उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव वाळके करणार आहेत.

भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, ऐतिहासिक भीमसृष्टी येथे होणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026

वाढदिवसानिमित्त साधेपणा; डब्बू आसवाणी यांचे सामाजिक भान जपणारे आवाहन

March 31, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.