Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

₹४३०.७५ कोटींच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी; स्थायी समितीत गदारोळ

July 2, 2026

पद नाही, अधिकार नाही; तरीही स्थायी समितीत देवण्णा गट्टुवारांचा हस्तक्षेप? पेन्शन लाखोंची, तरी महापालिकेचा मोह सुटेना; गट्टुवार पुन्हा चर्चेत

June 24, 2026

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पत्राची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

May 22, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home » ₹४३०.७५ कोटींच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी; स्थायी समितीत गदारोळ
पिंपरी चिंचवड

₹४३०.७५ कोटींच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी; स्थायी समितीत गदारोळ

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJuly 2, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, दि. २ जुलै २०२६ (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तब्बल ₹४३०.७५ कोटींच्या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत आयत्यावेळी मंजुरी देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक विषयाला ऐनवेळी मंजुरी देण्यामागील कारणांवर विरोधी सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत निर्णयाला जोरदार विरोध केला. मात्र, बहुमताच्या जोरावर हा विषय मंजूर करण्यात आला.

गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली निविदा प्रक्रिया अचानक अंतिम टप्प्यात आणून मंजुरीसाठी मांडण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त करण्यात आला. विरोधी सदस्यांनी हा निर्णय घाईघाईत घेतल्याचा आरोप करत निविदा प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या कामकाजासह संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. “प्रत्येक मोठा आर्थिक विषय आयत्यावेळीच का आणला जातो? यामागे काहीतरी संशयास्पद कारण आहे,” असा आरोप त्यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संदीप वाघेरे यांनीही निविदा प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत गुजरातमधील कंपनीला प्राधान्य दिल्याचा आरोप केला. “महाराष्ट्रातील कंपन्या अपात्र ठरतात आणि बाहेरील कंपनीला काम दिले जाते. यामागे रिंग असल्याचा संशय असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक नाही,” असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, मूळा नदी सुधारणा प्रकल्पाचे काम करणारी बी. जी. शिर्के कंपनीही या निविदेत अपात्र ठरल्याने विरोधकांनी निविदा प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

यावर स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ७ जुलै रोजी प्रस्तावित भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा विषय तातडीने मंजूर करण्यात आला. या प्रकल्पामुळे इंद्रायणी नदीतील प्रदूषण कमी होऊन नदी संवर्धनाला मोठी चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला.

मात्र, विरोधकांचे म्हणणे आहे की भूमिपूजनाच्या घाईपोटी साडेचारशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून त्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण निविदा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून संबंधित बाबी जनतेसमोर आणाव्यात, अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

April 30, 2026

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

April 30, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.