राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ऐश्वर्यम हमारा सोसायटीधारकांना पाण्याच्या एक कोटी रुपयांचा दिलासा – भाजपा आमदार महेश लांडगे यांची प्रभावी मध्यस्थी – सोसायटीधारकांकडून मनःपूर्वक आभार

 

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :

भोसरी विधानसभा मतदारसंघातील ऐश्वर्यम हमारा सोसायटी फेज-१ व फेज-२ मधील रहिवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बिल्डरकडे प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या देयकाचा प्रश्न भाजपा आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या सक्रिय व प्रभावी मध्यस्थीमुळे अखेर मार्गी लागला आहे. आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे बिल्डरने सदर रक्कम सोसायटीस देण्यास सहमती दर्शविली आहे.

सोसायटीधारकांनी सांगितले की, “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला पाणीपुरवठ्याचे हक्क मिळाले. ही मदत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे सोसायटीतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरच सुटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोसायटीच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “या आर्थिक दिलास्यामुळे केवळ पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तर सोसायटीतील इतर विकासकामांसाठीचा आर्थिक बोजाही कमी होणार आहे.” या यशाबद्दल आनंद व्यक्त करत सोसायटीधारकांनी भारतीय जनता पक्षाच्या चारही उमेदवारांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे.

सोसायटीधारकांच्या प्रश्नांबाबत आमदार महेश लांडगे यांनी नेहमीच सकारात्मक व ठाम भूमिका घेतली आहे. सोसायटीधारकांसाठी स्वतंत्र धोरण ठरवावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली होती. तसेच, सोसायटी परिसरातील नियमबाह्य दारूविक्री दुकानांवर प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला आहे.

आमदार पै. महेशदादा लांडगे म्हणाले, “रहिवाशांचे हित आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या सोडवणे हेच माझे मुख्य ध्येय आहे. ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित प्रलंबित रकमेचा प्रश्न सुटल्याने मला अत्यंत आनंद झाला आहे. सोसायटीधारकांना त्यांचे हक्क मिळाले असून, आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. भविष्यातही नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक समस्येवर त्वरित व प्रभावी उपाय करणे ही माझी जबाबदारी आहे. एकत्रित प्रयत्न आणि संवादाच्या माध्यमातून कोणतीही अडचण सोडवता येते, हा विश्वास या निमित्ताने अधिक दृढ झाला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button