- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtra18news2026@gmail.com
पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी देवा भालके (दि. ३० एप्रिल २०२६) साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे थेरगाव चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या, विविध ९ भाषेतील ५५१ पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे. तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके) पिंपरी चिंचवड दि.३० एप्रिल २०२६: मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण* करण्यात यावे, या मागणीसाठी *हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघ तसेच पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज* यांच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व हिंदू मातंग सेनेचे संस्थापक प्रमुख अरूण जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसीलदार कार्यालय, निगडी-४४ येथे निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनंतर पार पडल्या आणि 128 नगरसेवक निवडून आले. भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 6 आणि 1 अपक्ष असा निकाल लागला. संख्याशास्त्राच्या पलीकडे या निवडणुकीची खरी ओळख ठरते ती म्हणजे 50 टक्के महिला आरक्षण—64 महिला आणि 64 पुरुष असे समसमान प्रतिनिधित्व. कागदोपत्री पाहता हे चित्र प्रगतिशील वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. परंतु प्रश्न असा आहे की, या आरक्षणाचा खरा हेतू प्रत्यक्षात कितपत साध्य होत आहे? शहरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिला नगरसेवकांच्या जागी त्यांच्या पती…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनंतर पार पडल्या आणि 128 नगरसेवक निवडून आले. भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 6 आणि 1 अपक्ष असा निकाल लागला. संख्याशास्त्राच्या पलीकडे या निवडणुकीची खरी ओळख ठरते ती म्हणजे 50 टक्के महिला आरक्षण—64 महिला आणि 64 पुरुष असे समसमान प्रतिनिधित्व. कागदोपत्री पाहता हे चित्र प्रगतिशील वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. परंतु प्रश्न असा आहे की, या आरक्षणाचा खरा हेतू प्रत्यक्षात कितपत साध्य होत आहे? शहरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिला नगरसेवकांच्या जागी त्यांच्या पती…
पिंपरी-चिंचवड: देवा भालके:दापोडी परिसरातील ‘ग्रीन पार्क’ या गृहनिर्माण प्रकल्पात २०१९ साली लाखो रुपये गुंतवून फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांना अद्यापही घरे मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडल्यामुळे आज प्रकल्पातील गुंतवणूकदार नागरिक एकत्र येत बांधकाम व्यावसायिकांच्या घरी जाऊन जाब विचारला. “आम्ही २०१९ मध्ये पैसे भरले, कोविड काळातही सहकार्य केले. मात्र आजपर्यंत फ्लॅट मिळाले नाहीत. आमचे घर आम्हाला नेमके कधी मिळणार?” असा सवाल घरखरेदीदारांनी उपस्थित केला. अनेकांनी आपली आर्थिक अडचण आणि वाढलेला ताण याबाबतही भावना व्यक्त केल्या. यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, काही ग्राहकांनी अद्याप पूर्ण पैसे भरलेले नाहीत. उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन संबंधितांना…
मुंबई | २१ एप्रिल २०२६ : प्रतिनिधी: देवा भालके अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात सध्या तीव्र झाला असून, मातंग समाजासह इतर ५८ जातींच्या प्रतिनिधींनी मुंबईत एकत्र येत सरकारसमोर ठोस मागण्या मांडल्या. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी राज्य सरकारकडे तातडीने ‘एम्पिरीकल डेटा’ गोळा करून न्याय्य उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी केली. या बैठकीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू व डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे, लहुजी शक्ती सेना (पॉवर कमिटी) प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, तसेच राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोरखे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “समतेचा विचार” प्रत्यक्षात आणण्यासाठी अनुसूचित जातींमधील वंचित घटकांना…
पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पदावर जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय व ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेऊन त्यांना ‘घंटा भेट’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी ही सदिच्छा भेट होणार असून, यावेळी जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदांवर संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. शहरातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपच्या माध्यमातून अनेक आंदोलने व मोर्चे काढण्यात आले. या…
भोसरी (प्रतिनिधी देवा भालके) दिनांक ९ एप्रिल २०२६:- राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ या कार्यालयाचे उद्घाटन (दि.९) महापौर रवि लांडगे यांच्या…
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – देवा भालके पिंपरी परिसरात बेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास डिलक्स चौकातील राजश्री लॉटरी सेंटरसमोरील मोकळ्या जागेत करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई शिवाजी मुंडे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मधुकर चौधरी (वय ५२), राम दंडगुळे (वय २६), मोहम्मद मंसुरी (वय ३८), सोमनाथ शिंदे (वय ५०), लक्ष्मण रणदिवे (वय ४८) आणि विनोद एकबोटे (वय ४४) हे सहा जण विनापरवाना ‘मुंबई कल्याण’ मटका…
