राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

प्रभाग २१ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पिंपरी गावात भव्य जाहीर सभा सर्व पॅनल आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे मी केलेल्या कामाच फळ मला मला मिळणार विकासाच्या जोरावर सर्व पॅनल विजयी होणार डब्बू आसवाणी 

पिंपरी | प्रतिनिधी देवा भालके

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी पिंपरी गावात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे प्रभाग २१ मधील निवडणूक प्रचाराला मोठी रंगत येणार असून राजकीय वातावरण तापले आहे. ही माहिती माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी दिली.

डब्बू आसवानी पुढे बोलताना म्हणाले की, “अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली. त्या संधीचे मी पूर्णपणे सोने केले. माझ्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, नागरी सुविधा यांसह अनेक विकासकामे मार्गी लावली. आजही अनेक नागरिक त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येतात आणि त्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो.”

ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या अंतिम टप्प्यापर्यंत सोडवली जाते. त्यामुळेच आज मला जी जबाबदारी देण्यात आली आहे, ती आमचे नेते अजितदादा पवार यांनी दिली आहे. ‘डब्बू, सर्व फायनल पाने तुलाच आणायचं आहे,’ अशी जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली असून ती जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे.”

उद्याच्या जाहीर सभेबाबत बोलताना डब्बू असवाणी, म्हणाले “अजितदादांची ही सभा म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवर होणारी निर्णायक सभा ठरणार आहे. या सभेमध्ये विरोधकांचे पोलखोल होणार आहे. माझ्या प्रभागात कोणती कामे अपूर्ण आहेत, ती विरोधकांनी जनतेसमोर दाखवावीत. मी सर्वसामान्य जनतेला सहज भेटणारा माणूस आहे. त्यामुळे जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”

ते पुढे म्हणाले, “समोरचा उमेदवार कितीही समर्थ असो, विकासकामांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही निवडणूक जिंकणारच. अजितदादांची सभा झाल्यानंतर नेमके काय बोलले जाणार, कोणते मुद्दे मांडले जाणार, हे स्पष्ट होईल आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितच मोठा परिणाम दिसून येईल.”

या जाहीर सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याने पिंपरी गाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button