Author: maharashtra18news2026@gmail.com

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके : पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास, एक महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावले. यावेळी महिलेला ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे…

Read More

पिंपरी-चिंचवड: शहरांतील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता आणि आधार देण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी “ज्येष्ठानुबंध” या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी केवळ कायदेशीर मदतच नाही, तर ज्येष्ठांच्या वैयक्तिक अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये ‘ज्येष्ठानुबंध’ ॲप आतापर्यंत २८,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवला आहे. थेट मदत: या ॲपद्वारे ज्येष्ठ नागरिक आपल्या तक्रारी किंवा वैयक्तिक समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात, ज्यावर पोलीस तात्काळ कार्यवाही करतात. घरपोच वाढदिवस साजरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतः ज्येष्ठांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात जाऊन, केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा…

Read More

पिंपरी-चिंचवड:गुन्हे शाखा युनिट-३ ने चऱ्होली परिसरात मोठी कारवाई करत २,००,४८०/- रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौक जवळील एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये काही इसम विदेशी दारूची विक्री करण्यासाठी साठा करून बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून खालील आरोपींना ताब्यात घेतले: रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३, रा. चऱ्होली, पुणे) तिलक हेमंत पटेल (वय २१,…

Read More

मारुंजी (ता. मुळशी, जि. पुणे) येथे निर्मिती डेव्हलपर्सच्या नव्या व्यावसायिक प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभल्याने सोहळ्याला विशेष उंची प्राप्त झाली. या प्रसंगी डॉ. सुहास वारके, सुरेश काकडे, बाबासाहेब बुछाडे, विलास माडीगिरी, विजय कांबळे, डॉ. प्रीती रूपनार, जळिंदर गायकवाड आणि व्ही. ई. तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. दत्ता शेटे यांनी उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार व हितचिंतकांचे आभार मानले. त्यांच्या मते, सर्वांच्या सहकार्यामुळे हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला. मारुंजी येथील सर्व्हे क्र. 55/1/2/9/4 मधील हा प्लॉट व्यावसायिक वापरासाठी नियोजित असून, भविष्यात येथे दुकाने, स्टुडिओ अपार्टमेंट्स, क्लिनिक स्पेस तसेच…

Read More

पिंपरी–चिंचवड: प्रजासत्ताक दिन (२५ जानेवारी) च्या पूर्वसंध्येला पिंपरी–चिंचवड पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपतींचे पदक जाहीर करण्यात आले आहे. हे पदक त्यांच्या उत्कृष्ट आणि उत्कृष्ठ सेवेसाठी देण्यात येणार आहे. पदकाबद्दल महत्त्वाची माहिती विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतींचे पोलिस दलातील गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. हे त्यांच्या सेवा कारकिर्दीत मिळवलेले दुसरे राष्ट्रपती पदक आहे, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीचा विशेष गौरव झाले आहे. विठ्ठल कुबडे — कारकिर्दीचा प्रवास सेवा प्रवेश: १५ सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्र पोलिस सेवेत रुजू झाले. प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली. त्यांनी नक्षल प्रभावित भागात गोरेगाव, सालेकसा, शिवहोरा यांसारख्या ठिकाणी सेवा बजावली आणि नक्षली…

Read More

पिंपरी, चिंचवड पुणे (दि. ११ जानेवारी २०२६) प्रतिनिधी देवा भालके:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला भगिनी व ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. एनसीपीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत महिलांना सत्तेमध्ये सहभागी करून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे देऊन त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला आहे. अजित दादांनी दूरदृष्टीकोण डोळ्यापुढे ठेवून घेतलेल्या निर्णयामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५० टक्के पेक्षा जास्त महिला नगरसेवक झाल्या. महिला आणि ज्येष्ठांचा सन्मान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज…

Read More

पिंपरी, चिंचवड पुणे प्रतिनिधी देवा भालके (दि. १० जानेवारी २०२६) गाव खेड्यांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड शहराची स्थापना झाली. आता पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रोसिटी म्हणून ओळखले जात आहे. आय. टी. उद्योग, शिक्षण आणि रोजगारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असलेल्या बेरोजगार तरुणांना पिंपरी चिंचवड येथे रोजगार मिळण्याची खात्री वाटते, मागील ३५ वर्षात लोकांमध्ये हा विश्वास मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी नियोजन करून निर्णय घेतले आहेत. विकासाचा वेग मागील १० वर्षात कमी झाला होता. आता पुन्हा महापालिकेत राष्ट्रवादीला सत्ता द्या असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवाणी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील…

Read More

पिंपरी चिंचवड (१० जानेवारी २०२६) प्रतिनिधी देवा भालके : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी रोजी घड्याळाचे चिन्ह पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जमुक्त करून शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल असे आस्वासन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पिंपरी येथील सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे आयोजित केलेल्या सभेत अजितदादा पवार यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी आमदार रोहित पवार, माजी…

Read More

पिंपरी चिंचवड| प्रतिनिधी देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारास सम्यक स्वयं सेवा संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सम्यक स्वयं सेवा संस्था (पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने काढण्यात आलेल्या जाहीर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधा या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची भूमिका ठोस व विकासाभिमुख आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील पाणीपुरवठा, गटारे, रस्ते, वीज, आरोग्य सेवा, बेरोजगारी आणि महिला सुरक्षिततेसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याची क्षमता उमेदवारांकडे असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे. सम्यक स्वयं सेवा संस्थेचे…

Read More

पिंपरी | प्रतिनिधी देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डब्बू आसवाणी, संदीप बाळकृष्ण वाघेरे, प्रियांका सुनील कुदळे व निकिता कदम या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. प्रभागातील प्रमुख रस्ते, चौक आणि वसाहतीतून ही बाईक रॅली मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोषात उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. चौका-चौकात करण्यात आलेल्या जंगी स्वागतामुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी आणि पक्षाच्या घोषणा देत रॅलीने…

Read More