Author: maharashtra18news2026@gmail.com

पिंपरी-चिंचवड : देवा भालके अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे तसेच अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. तात्काळ उपाययोजना शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी करून…

Read More

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी देवा भालके अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील अनेक ठिकाणी सुरू असलेली खोदकामे, अपूर्ण कामे, खड्डे तसेच अपुऱ्या निचरा व्यवस्थेमुळे रस्त्यांवर पाणी साचले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालक, पादचारी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर महापौर रवि लांडगे यांनी तातडीने परिस्थितीची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाला सर्वसमावेशक आणि परिणामकारक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. महापौरांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन स्तरांवर नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. तात्काळ उपाययोजना शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची तातडीने पाहणी…

Read More

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी देवा भालके पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवाणी यांचा वाढदिवस यंदा अत्यंत साधेपणाने साजरा होत असून, त्यांच्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय पुन्हा एकदा शहरवासीयांना आला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात वाढदिवस साजरा करणारे डब्बू आसवाणी यांनी यंदा मात्र वेगळा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवसाचा उत्सव टाळण्याचा निर्णय घेतला आहे. “शुभेच्छा स्वीकारणार आहे, मात्र केक किंवा पुष्पगुच्छ आणू नका. त्याऐवजी गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आणावे,” असे भावनिक आणि सामाजिक भान जपणारे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे . “नारळासारखा बाहेरून कडक पण आतून मऊ, आणि नारळाच्या…

Read More

पिंपरी-चिंचवड: (प्रतिनिधी देवा भालके) शहरात रिक्षा चोरी करून त्याच वाहनाचा वापर करत जबरी चोरी व मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून १ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकाच दिवशी घडलेले तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट-३ भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला. त्यानुसार भोसरी येथील ‘स्टार झुडिओ’ समोर सापळा रचून हारीश विनोद कदम (वय २०, रा. बिबेवाडी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत…

Read More

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके):बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे, विशेषतः महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिला टोळीचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट-३ ने पर्दाफाश करत सहा महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ८९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे. एम.आय.डी.सी. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-३ समांतर तपास करत होती. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळापासून शिक्रापूरपर्यंतच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिला टोळी शिरूर तालुक्यातील जातेगाव येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी जातेगाव येथे सापळा रचत महिला सहाय्यक…

Read More

पिंपरी-चिंचवड देवा भालके: शहरात ‘बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती’ आणि विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती महोत्सव २०२६’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदा या महोत्सवाचे पाचवे वर्ष असून, गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी ऐतिहासिक भीमसृष्टी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील महान शासनकर्ते म्हणून ओळखले जाणारे सम्राट अशोक यांनी बुद्ध धम्माचा प्रसार जागतिक स्तरावर केला. त्यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता सम्राट अशोक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून होणार आहे.…

Read More

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके):पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने वाहन चोरी व घरफोडीच्या मालिकेचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ५ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ रा. महेंद्रनगर, नेपाळ) याला अटक केली आहे. आरोपी येरवडा कारागृहात असताना त्याला ताब्यात घेऊन तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला. पोलिसांच्या तपासात आरोपीने दक्षिण महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरासह आसपासच्या भागातून वाहन चोरी आणि घरफोडी केल्याचे समोर आले. त्याच्याकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात…

Read More

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके : पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. ७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास, एक महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावले. यावेळी महिलेला ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे…

Read More

पिंपरी-चिंचवड: शहरांतील ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षितता आणि आधार देण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी “ज्येष्ठानुबंध” या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी केवळ कायदेशीर मदतच नाही, तर ज्येष्ठांच्या वैयक्तिक अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये ‘ज्येष्ठानुबंध’ ॲप आतापर्यंत २८,००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवला आहे. थेट मदत: या ॲपद्वारे ज्येष्ठ नागरिक आपल्या तक्रारी किंवा वैयक्तिक समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवू शकतात, ज्यावर पोलीस तात्काळ कार्यवाही करतात. घरपोच वाढदिवस साजरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी स्वतः ज्येष्ठांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात जाऊन, केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा…

Read More

पिंपरी-चिंचवड:गुन्हे शाखा युनिट-३ ने चऱ्होली परिसरात मोठी कारवाई करत २,००,४८०/- रुपये किमतीचा विनापरवाना विदेशी दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौक जवळील एका शेतातील पत्राच्या शेडमध्ये काही इसम विदेशी दारूची विक्री करण्यासाठी साठा करून बसले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून खालील आरोपींना ताब्यात घेतले: रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३, रा. चऱ्होली, पुणे) तिलक हेमंत पटेल (वय २१,…

Read More